तळोधी पोलिसांनी व स्वाब संस्थेने केला रस्त्यावरील चिखल(गाळ) साफ सावरगाव – वाढोणा रस्त्यावर चिखलावरून दिवसभरातून शेकडो वाहनचालकांचा झाला अपघात

0
90
  • तळोधी बा.
    पोलीस स्टेशन तळोधी बाळापुर अंतर्गत येणाऱ्या सावरगाव – वाढोणा या रस्त्यावर बाजूने वाहणाऱ्या बोकडोह नदीला आलेल्या अचानक पुरामुळे या रस्त्यावर चिखल(गाळ) जमा झालेला होता. त्यामुळे पूर उतरल्यानंतर या रस्त्याने रहदारी सुरू झाली. मात्र सकाळपासून शेकडो दुचाकी व चार चाकी वाहनांचा या ठिकाणी गाडी स्लिप होऊन अपघात झाला. ही बाब तळोदी पोलीस व स्वाब संस्थेच्या निदर्शनास येताच त्यांनी तो रस्ता अग्निशामक दलाची नागभीड येथून गाडी बोलवून पाण्याचा प्रेशर व फावळ्यांच्याद्वारे या रस्त्यावरील (चिखल) गाळ बाजूला करून रस्ता पूर्ववत केला. पोलिसांनी स्वतः स्वाब संस्थेच्या सदस्यांसोबत सहभाग नोंदवत केलेल्या या परिश्रमाबद्दल रहदारी करणाऱ्या लोकांनी व परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे.
    यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे व त्यांची तळोधी पोलीस कर्मचारी सोबतच स्वाब संस्थेचे यश कायरकर,जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, अमन करकाडे, गिरीधर निकुरे, शुभम निकेशर, तर पत्रकार भारत चुनारकर , कमलकिशोर चुनारकर , सावरगाव चे सरपंच रवी निकुरे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश निकुरे, शरद खांडेकर, यांनी या कार्यास सहकार्य केले.
Previous articleवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, नागभिड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील घटना
Next articleवाघाच्या हमलात नवानगर (सोनूली) येथील महिला ठार   ब्रह्मपुरी वन विभाग मधिल दोन दिवसात दुसरी, तळोदी वनपरिक्षेत्रातील पहिली घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here