मुल:-
गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातलेला असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलेलाआहे, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका असून येथील जास्तीत जास्त कुटुंबाचे उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून आहे मूल तालुका ध्यान पिकासाठी म्हणून ओळखल्या जातो मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे ज्यामध्ये धान सोयाबीन कापूस इत्यादी पिकांचं समावेश आहे तसेच सदर अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कित्येक नागरिकांचे घरे पडलेली आहेत व शेताचे तर शेताचे आणि घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे कित्येक नागरिकांना राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था नसून गोरगरीब बांधवांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे करिता शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय संदीप भाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या नेतृत्वात मूल तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. शासन स्तरावरील तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधव तसेच नागरिक यांना सरसकट मदत देण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका मूलच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश राम, सौराज इटकलवार ग्राम.सदश्य चीचाला,शिवसेना शाखाप्रमुख किरण शेंडे युवासेना शाखाप्रमुख वेदांत गनटलेवार,रोशन टेकाम,अमर सिडाम. आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.