यश कायरकर
नागभीड तालुक्यातील कोरंबी या गावांमध्ये तसेच ग्रामपंचायत पेंढरी (बरड) या गावांमध्ये ‘स्वाब फाउंडेशन व हॉस्पिटल रिचार्ज इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जंगला लगतच्या दुर्गम गावामध्ये जाऊन लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने स्वाब फाउंडेशन तथा ब्रह्मपुरी रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने अशा आरोग्य शिबिराचे आयोजन नेहमी केले जाते. यामध्ये या गावातील लोकांचे मोफत आरोग्य तपासणी त्यानंतर आवश्यक आठवड्या भरायच्या औषधी वाटप व या गावातील किंवा आरोग्य तपासणी करणाऱ्या पैकी कुणाला ‘हर्निया किंवा हायड्रोसिल’ चा त्रास असेल तर डॉ. खिजेंद्र गेडाम ब्रम्हपुरी यांच्या दवाखान्यामध्ये 26 जानेवारी व 15 ऑगस्ट ला कॅम्प घेऊन त्यांच्या नावाची लिस्ट बनवून मोफत त्यांचेवरील मोफत शस्त्रक्रिया केल्या जाते. तसेच या दुर्गम गावातील लोकांना चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली या ठिकाणी दवाखान्यामध्ये आवश्यकता पडल्यास रक्ताचा मोफत पुरवठा करण्याची व्यवस्था फाउंडेशन ही वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून करत असते. या उद्देशाने लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचवणे व जंगलातील गावाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता हा कॅम्प कोरंबी या गावांमध्ये व ग्रामपंचायत पेंढारी(बरड) येथे घेण्यात आला. यावेळी पेंढरी च्या कॅम्प मध्ये कसरला, व रेंगातूर या गावच्या 132 लोकांनी आरोग्य तपासणी केली. तर कोरंबी येथील या कॅम्पमध्ये डोंगरगाव व कोरंबी येथील 38 लोकांनी आपली आरोग्य तपासणी केली.
यावेळी ब्रह्मपुरी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. खिजेंद्र गेडाम व डॉ. लीना भोयर यांनी आरोग्य तपासणी केली यावेळेस त्यांचे इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. तर स्वाब फाउंडेशनचे महिला विभाग प्रमुख कल्पना गेडाम, यश कायरकर, हितेश मुगमोडे, जिवेश सयाम, छत्रपती रामटेके, नितीन भेंडाळे, भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेशर, अमन कडकाडे, अमीर करकाडे, महेश बोरकर, राहुल कांगिरवार कोरंबी येथील सीआरपी सौ. रजनी नन्नावरे(सी.आर.पी.) महादेव नन्नावरे, व पेंढरी येथील गंगाधर समर्थ (माजी सरपंच), अविनाश शिरपुरे (संगणक चालक) यांनी सहकार्य केले.