मूल :-
सलग दोन दिवस झाले सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे मुल शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने अनेक कुटुंब घरापासून वंचित झाले आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, यात भूमिपुत्र ब्रिगेड मुल चे सदस्य अभिलाषा गावतुरे याच्या सुचनेनुसार भूमिपुत्र ब्रिगेड च्या माध्यमातून कालपासून मदतीचा हात समोर केला आहे, आज शिवाजी नगर मध्ये आठवडी बाजार शेजारी गरजू लोकांना धान्य किट देऊन सामाजिक बाधीलकी जोपासली.या वेळेस भूमिपुत्र ब्रिगेड चे राकेश मोहूर्ले,सचिन आंबेकर, नितेश मॅकलवार,अतुल मडावी व इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते.