रात्रो भरपावसात भरला सोनापुर गोंविदपुर मार्गावरील पुलीयाचा स्लांब,कंपनीचा मनमानी कारभार,नागरिकांचा आरोप

0
303

यश कायरकर

तळोधी बा:- एम.के.एस.कंपनीच्या वतीने नागभीड तालुक्यात करोडो रुपयांचे कामे सुरु असुन शुक्रवार व शनिवारी संपुर्ण विदर्भात दिवस रात्र मुसळधार पाऊस सुरु असताना शनिवारच्या रात्री भरपावसात रात्री अडीच वाजेपर्यत सोनापुर गोंविदपुर मार्गावरिल बांधकाम सुरु असलेल्या पुलीयांचा स्लांब शासकिय अंभियंताच्या देखरेखेखाली न भरता परस्पर मनमानी कारभार करून भरला असल्याने निकुष्ट दर्जाचे पुलीया बांधकाम झाले असल्याचा आरोप सोनापुर येथील उपसंपंच महेश फटिंग यांनी केला असून निकुष्ट कामाची चौकशी करण्यांची मागणी करण्यात आली आहे.

मागील तीन चार वर्षापासून या परिसरात मोठया प्रमाणात एम.के.एस.कंपणी द्वारे रस्यात्याचे काम सुरु असून अनेक ठिकाणी निकुष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.सोनापुर मार्गावरील सिमेंट क्रांकीट रोड उखडलेला आहे.नागरिकांच्या वतीने आरडाओरड करून रसत्यांची योग्य पध्दतीने काम करण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

करोडो रुपये खर्च करून सोनापुर गोंविदपूर मार्गावरील पुलीयांचे बांधकाम सुरु आहे.या मार्गावर नेहमी जड वाहतुकीची रहदारी सुरू असते.मात्र शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनापुर नाला‌ तुंडूब भरुन वाहू लागला.या मार्गावरील रोडच्या पुलीया बांधकाम मुळे बाजुला वाहतुकीसाठी डिवायडर काढला होता.मात्र मुसळधार पावसामुळे रफटा पुर्णपणे वाहून गेला.रफट्यावरील गिट्टी बाजूला असलेल्या मदनकर यांच्या शेतात वाहून गेली.मुसळधार पावसामुळे नाल्यामधून तुंडुब भरुन वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे केरकचरा व व मातीचा गाळ सोनापुर गोंविदपुर मार्गावर साचलेला असताना सोनापुर वासीय नागरिकांनी या मार्गावरील स्लांब भरण्यास विरोध केलेला असताना एम.के.एस.कंपनी ने मनमानी कारभार करून शासकीय अंभियंता हाजर नसताना कंपनीच्या अंभियंताच्या देखरेखेखली मजूरांच्या साहाय्याने रात्री भरपावसात अडीच वाजेपर्यत स्लांब भरला.या स्लांबवर मजुराचे पाय उमटलेले असून निकुष्ट दर्जाचे काम झाले असून मोबाईल टार्च सानिध्यात पुलीयाचे स्लांब टाकण्यास परवानगी कुणी दिली.असा नागरिकांनी केला असून या कामाची चौकशी करण्यांची मागणी नागगरिकांनी केली आहे.

“सोनापुर गोंविदपुर मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलीयांचा स्लांब शनिवारी रात्री अडीच वाजेपर्यत भरपावसात स्लांब भरण्यात आला.हा मार्ग नेहमी जड वाहतुकीचा मार्ग असताना नागरिकांनी स्लांब भरण्यास विरोध केलेला असताना कंपनीने मनमानी कारभार करून व्हायब्रेट मशिन न लावता मजूराच्या साहाय्याने या मार्गावर स्लांब टाकला असून ते निकुष्ट दर्जाचा पुलिया झाले असून यांची चौकशी करण्यांची मागणी संबधीत विभागाकडे करण्यात येईल.”

 

Previous articleवाढदिवसाचे नियोजित कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत
Next articleउद्या शाळेला सुट्टी जाहीर सततधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here