विलम येथील मुलगा पुलावरून फिरताना गेला वाहून शोधाशोध सुरू

0
245
  • यश कायरकर.:

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील विलम येथील रुणाल प्रमोद बावणे (१२) हा मुलगा नाल्याच्या पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली.

काल रात्री पासून सुरू असलेल्या पावसाने गावच्या नाल्या वरून पाणी वाहत जात असल्याने गावकऱ्यासोबत काही मुलं हे नदी पुलावर फिरायला गेले. तेव्हा एका व्यक्तीने आपली दुचाकी नदीच्या पुलावरून पैदल ढकलत नेल्यानंतर विलम येथील रुणाल प्रमोद बावणे (१२) हा इयत्ता पाचव्या वर्गात जनता विद्यालय नागभीड येथे शिकणारा हा त्यांच्या मागे पुलावरून धावत येत असताना अंदाज न आल्याने तो पुलाच्या खाली गेला व वाहून गेला.

त्याला वाहत जात असताना पाहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न पाण्यामध्ये उतरला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये तो वाहून गेला नंतर स्थानिक गावकरी व पोलीस प्रशासणाच्या वतीने शोधमोहीम सुरु आहे.अजून पर्यन्त त्याचा शोध लागला नाही. या घटनेच्या वेळी पुलावर दोन्ही बाजूला असलेले लोक पाण्याचा व्हिडिओ बनवत असल्यामुळे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी दृश्य हे लोकांसमोर आले.

Previous articleघरात घुसलेला बिबट्या जोरबंद मात्र रेस्क्यू पुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात सहा जख्मी, सावली वनपरिक्षेत्रातील घटना.
Next articleमुल शहरात पावसाचे थैमान नाम. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार प्रशासन अलर्ट मोडवर भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी जनतेच्या मदतीला 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here