यश कायरकर
तळोधी (बा.) पोस्ट ऑफिस तळोधी मधील नागरिकांचे अनेक महत्वाचे कागदपत्रे पोस्टमननी कबाळी मधे विकले असल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी स्वतःचे कागदपत्रे घेवून आले. घटनेची माहिती सोशल मिडिया वर पसरतात तळोधीत एकच खडबड उडाली मात्र कबाळीमधून काही वेळानी संपुर्ण विकलेले कागदपत्रे गोळा करून नंतर नागरिकांना वाटप करण्यांत आल्याचे समजते.
नागभिड तालुक्यातील तळोधीची लोकसंख्या १५ हजारच्या जवळपास असुन अप्पर तालुक्यांचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक क्षेत्र, बाजार समिती, पोलिस स्टेशन, वनविभाग, प्रथमिक आरोग्य केंद्र, आदी सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळें नागरिकांचे पोस्ट ऑफिस मधून व्यवहार होत असतात. असातच, आधार कार्ड, पॅनकार्ड, एलआयसी पावती, पाक्षिक, साप्ताहीक वृत्तपत्र, नौकरी पत्र, निवडणूक ओळखपत्र, इत्यादी कागदपत्रांचा व्यवहारात पोस्ट ऑफिस मधून होतं असतो. मात्र पोस्टमॅनच्या हलगर्जीपणा मुळे गेले कितेक दिवसांपासुन महत्वाचे कागदपत्रे नागरिकांना वाटप न करता जमा करून कबाळी मधे विकण्यात आल्याने पोस्ट ऑफिस संदर्भात आजच्या घटनेने जनतेचा विश्वास उडाला असल्याचे दिसत आहे. तळोधी पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमॅन म्हणून एक महिला कार्यरत असुन बाहेर गावावरून ये-जा करित असुन तळोधी येथिल एक इसम पोस्टाचे पत्र वाटप करण्याचे काम करित असल्याने त्यांनी वाटप न करता कबाळी मधे विकले असल्याचे समजते. जनतेच्या सेवेसाठी कार्य करण्यासाठी पोस्टमॅनची नेमणुक करण्यात आली असली तरी असा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तळोधी येथिल नागरिकांनी केली आहे.