Home क्राइम मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास अटक
- यश कायरकर, (तालुका प्रतिनिधी);
पत्नीच्या गैरहजेरीचा फायदा घेत स्वताच्या अल्पलयीन मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना नागभीड तालुक्यातील एका गावात घडली.
आरोपीचे पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. एप्रिल महिन्यात आरोपीची पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेली होती. याचवेळी तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेली १३ वर्षीय ही अभागी मुलगी शाळेला सुट्ट्या लागल्याने गावी आली.
पत्नी घरी नसल्याने मुलीला पाहून आरोपीच्या अंगातील सैतान जागा झाला आणि त्याने पोटच्या मुलीशीच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. मुलीने विरोध केला. पण धमकावून तो तिला चूप ठेवत होता. आणि हे वारंवार घडत होते.
अशातच शाळा सुरू झाल्या आणि मुलगी परत शाळेत गेली. शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत सदर मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आणि शाळा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.
© All Rights Reserved