मूल :-विद्यार्थ्यांना निवडणूक पद्धती बद्दल व त्याच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी ची निवडणूक घेऊन त्यांना भारतीय लोकशाही बद्दल माहिती देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता बुटे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक बद्दल माहिती देऊन योग्य प्रतिनिधी निवडण्याचे महत्व सांगितले.
त्यानंतर वर्ग 6 ते 8 वी तील विद्यार्थी निवडणुकी करिता उभे होते. त्यांचे मतदान घेण्यात आले. त्या पैकी 17 विद्यार्थी बहुमतांनी निवडून आले. त्यांना मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधान- प्राची प्रविण मोहुर्ले तर उपपंतप्रधान – अथर्व लक्ष्मण खोब्रागडे, वर्ग 8 वी तसेच इतर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मंत्री मंडळाचे खाते वाटप करण्यात आले. त्यानंतर शपथ विधी घेण्यात आला.
शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.