यश कायरकर
तळोधी (बा.) :
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही जंगल परिसरातील मानकादेवी परिसरातून जंगलातून गेलेल्या गोसेखुर्द कालव्यात एक निलगाय पडली असल्याची माहिती ‘स्वाब’ संस्थेला ग्रामस्थां द्वारे कळविण्यात आले. त्यांनी वन विभागाला ही माहिती देऊन स्वतः घटनास्थळ गाठले व नहरात पडलेल्या निलगायला काढण्यासाठी स्वतः नहरात ऊतरुन दोन तास अथक परिश्रम करून संस्थेचे बचाव पथकाचे सदस्यांनी सुरक्षित नहराचे बाहेर काढले. तसेच जखमी अवस्थेत व कानाला गंभीर दुखापत झालेल्या नीलगायचा कानाची जखम पूर्णपणे स्वच्छ करून मरहमपट्टी करून शिंदेवाही येथील पशुधन विकास अधिकारी कुमारी शालिनी लोंढे यांनी औषधोपचार केले. यावेळी सोबत पशुवैद्यक कर्मचारी कैलास खोब्रागडे, व दिलीप जाधव हे होते.
नंतर या अंदाजे सहा ते आठ महिने वयाच्या नर निलगाय ला वन विभागाचे आलेवाही बीटाचे वनरक्षक पंडित मेकेवाड व आकापूर बीटाचे वनरक्षक राजेंद्र भरणे यांच्या उपस्थितीत सुरक्षित सोडण्यात आले. यावेळी स्वाब संस्थेचे बचाव पथकाचे यश कायरकर, जिवेश सयाम, गणेश गुरनुले, अमन करकाडे, सुमित गुरनुले, तर स्थानिक रामदिन नान्हे यांनी परिश्रम घेऊन या निलगायला सावधान पने बाहेर काढून सुरक्षित जंगलात स्वतंत्र केले.
“जंगल परिसरात रेल्वे विभागासोबत गस्त असल्यामुळे संपूर्ण कर्मचारी तिकडे होते. यावेळी स्वाब च्या सदस्यांनी मदत करून निलगायीला कालव्याचे बाहेर व यावेळी आमचे वनरक्षक का समक्ष सुरक्षित सोडून दिले, या परिसरात कालव्यावर उडान पूल बनवण्याकरता सर्वे करण्यात आलेला आहे”
– अरूप कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी(बा)
“गोसेखुर्द चा हा कालवा जंगलातून गेलेला असून कालव्याला दोन्ही बाजूला असलेल्या भिंती ह्या पंधरा ते वीस फूट उंच पर्यंत सरळ घसरणीचे असल्यामुळे व कित्येक अंतरापर्यंत एकही पायरी नसल्यामुळे आणि हा परिसर जंगल व्याप्त व जंगलातून प्राण्यांचा येण्या जाण्याचा रहदारी मार्ग असल्यामुळे यात पडलेले कोणतेही वन्यजीव हे स्वतःहून कालव्यातून सुरक्षित निघू शकत नाही. त्यामुळे या परिसरात वन्यजीवांना ये-जा करण्याकरिता, भ्रमण मार्गाची व पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. तरी तात्काळ या परिसरामध्ये शंभर मीटर रुंदीचा पुलिया बनवून वन्यजीवांना इकडून तिकडे येण्या जाण्याचा मार्ग खुला करावा.”
– यश कायरकर, अध्यक्ष स्वाब संस्था.