मुल तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10 वाजता दरम्यान राजेश बोधलकर यांची हत्या करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागेच्या वादातून या इसमाची हत्या केल्याचे समजले. आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
घराशेजारील केबल बाजूला कर, असे म्हटल्याप्रकरणी रागाच्या भरात बाप, लेकाने घराशेजारील युवकाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. हि हृदयद्रावक घटना तालुक्यातील हळदी येथे सकाळी 10.00 वाजता घडली. मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर (वय 30) वर्ष आहे.
घराशेजारी असलेल्या झाडाचे फांद्या तोडल्यानंतर लागूनच असलेला केबल बाजूला कर, असा प्रेमाने सांगणाऱ्या घराशेजारील युवकावर सूरज गुरुदास पिपरे (वय 21),आणि गुरुदास नक्तू पिपरे या बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून राजू शेषराव बोदलकर या युवकाचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतक हा अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा होता. मृत्युपश्चात त्याला एक मुलगा,एक मुलगी व पत्नी आहे.
Gst