- चंद्रपूर , प्रतिनिधी.
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर आता आपले सरकार आँनलाईन सेवा केंद्रावर गर्दी करण्याची आवश्यकता नाही आणि स्वतःची लूटही करुन घेण्याची आवश्यकता नाही कारण काय तर आता सरकारने तुमच्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केले आहे.
आता तुम्ही घरबसल्या हा ॲप डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करू शकता.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी नारी शक्ती ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज नेमका कसा करता येईल हे आम्ही आपल्याला स्टेपनुसार सांगणार आहोत..
नारीशक्ती दूत App वरून असा भरा अर्ज / Maharashtra Nari Shakti App Login
स्टेप १:
सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा. अॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.’ असा मेसेज दिसेल
स्टेप २:
यानंतर तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा.
स्टेप ३:
लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या अॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ४
यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप ५
त्यानंतर इथे महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान असायला हवं.
स्टेप ६
त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावं लागेल. तसंच तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडावी. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. तसंच यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल.
स्टेप ७
पुढे तुम्हाला अशी माहिती विचारण्यात येईल की, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा.
स्टेप ८
यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा.
स्टेप ९
यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल.
त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा. त्यानंतर माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा काय केली ,जणू आपल्या हातात घबाड लागलंय या भावनेने आपले सरकार आँनलाईन केंद्र चालकांनी या योजनेच्या फार्मसी किंमत २०रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत विक्री करण्याचा सपाटाच लावला व इच्छुक लाभार्थ्यांना लुटण्याचा नवा गोरखधंदा सुरू केला , जेंव्हा की या योजनेसाठी अर्ज मोफत भरून देण्याची शासनाने सोय केली असून त्यासाठी आँनलाईन केंद्र चालकांना प्रती अर्ज शासन पन्नास रुपये अनुदान देणार आहे,असे असताना बऱ्याच ठिकाणी अर्ज भरुन देण्यासाठी मनमानी वसूली सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या असून तहसीलदार व संबंधित यंत्रणेकडे याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने काही ठिकाणी तहसीलदार यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्र वा आपले सरकार आँनलाईन सेवा केंद्रावर कोणतेही शुल्क न देता अर्ज भरुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत,व याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
याबाबत जनतेने जागरुकतेने अती घाई न करता आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून हा अर्ज भरण्यासाठी ह्या ॲपची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनाही हा अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ऑगष्ट महिनाअखेर असली तरीही ते नंतरही स्विकारण्यात येणार असून ह्या योजनेचा लाभ १जूलैपासूनच मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही मध्यस्थ वा दलालांच्या माध्यमातून जाऊन आपली लूट करुन न घेता सावकाश या सोयीसुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन , ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी समस्त इच्छुक महिला, भगिनी,यांना केले आहे.