कंपनीने टाकलेल्या अन्नातून शेळ्यांना विषबाधा , 8 शेळ्या मृत्युमुखी , मोबदला मिळण्यासाठी कंपनीच्या बाहेर ठीय्या आंदोलन 

0
62
  • सावरगाव वार्ताहर :-

नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे “सोनाई प्रायव्हेट लिमिटेड” ही कंपनी कार्यरत आहे . कंपनीच्या बाहेर टाकलेल्या अन्नातून विषबाधा होऊन आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असा आरोप आहे. व यासाठी मोबदला मिळावा यासाठी वारंवार कंपनीकडे मागणी केली जात आहे परंतु कंपनीचे जबाबदार अधिकाऱ्याने वेळ मारून नेत शेळी मालकांना हुलकावणी दिली जात आहे परंतु आज 4. जून ला शेळी मालकांनी कंपनीच्या गेटच्या समोरच धनगर समाजाचे वतिने कृष्णा गंजेवार अध्यक्ष नागभिड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) यांनी ठिय्या आंदोलन करून कंपनीला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे

नागभीड तालुक्यातील वाढोना येथे सोनाई प्रा .लि. ही कं. गोसीखुर्द कॅनलचे काम करीत आहे. कंपनीच्या बाहेर खुला परिसर असून या परिसरात कंपनीने वाचलेले अन्न टाकले व त्यांना चरायसाठी सोडलेल्या 22. शेळ्यांनी खाल्ले त्यात 8. शेळ्या उपचाराअंती मृत्युमुखी पडल्या त्यामुळे शेळी मालकांनी आपण टाकलेल्या अन्नातून शेळ्यांना विषबाधा झाली व त्यात 8. शेळ्या मृत्यू पावल्या असा आरोप करीत असल्याने त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई म्हणुन मोबदला देण्यात यावा यासाठी कंपनीकडे वारंवार मागणी सुरू आहे.

कंपनी वारंवार मागणीकडे दुर्लक्ष करून हुलकावनी देत आहे .

“शेळ्या मेंढ्या पालन करणे” हा मुख्य व्यवसाय असल्याने या व्यवसायिकांनी आज उग्ररूप धारण करत पाटबंधारे विभाग, व तहसिलदार यांना अर्ज करून प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कंपनीच्या गेटच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले परंतु तात्काळ तळोधी बा .पोलीस स्टेशनचे वतीने ठाणेदार अजित सिंग देवरे यांचे मार्गदर्शनात वाकडे मेजर ,हंसराज सिडाम , सोनाई कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गजभिये साहेब , सामाजिक कार्यकर्ते रुपेश डोरलीकर महामंत्री चंद्रपूर जिल्हा भाजपा , व समाजाचे वतीने कृष्णा गंजेवार , हरीचंद जीगरवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये चर्चा करून समोर निर्णय घेण्याचे मान्य केले.

आंदोलनात कृष्णा गंजेवार तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) नागभीड, यांच्या नेतृत्वात नागोजी चौडेवार समाजप्रमुख वाढोणा, युवराज डेकरवार, हरिचंद्र जिगरवार, रवींद्र येगेवार, बाबुराव ओगुवार, रमेश कोमावार, विनायक बुडमेवार, बाबुराव नसकुलवार, लक्ष्मण ओगुवार, गणेश उईनवार, आनंदराव नस्कुलवार, चक्रधर झोडे, लीलाधर सोनवाणे, स्वप्निल अंबोरकर,एकनाथ जिगरवार दौलत पोतरजवार , पुरुषोत्तम बुडमेवार, मयूर परसवार, मनोज कंकलवार, बंडूजी उईनवार, मंगेश अन्नावार, युवराज उईनवार ,भास्कर देवेवार व इतर उपस्थित आहेत.

Previous articleमुल येथे विद्यार्थी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार ख्यातनाम वक्ते, प्रखर विचारवंत , युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर करणार मार्गदर्शन
Next articleमाझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने दीपक देशपांडे,मूल तालुकाध्यक्षांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here