- बातमी संकलन :- यश कायरकर
- आज तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन परिसर येथे शेकडो विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, चिंच, जांभूळ, बदाम, आवळा, मुंगना, सारख्या फडझाडांची तर कडुलिंब, सिसम, शिवम, वड, पिंपळ, सारख्या मोठ्या वृक्षांची, तसेच कुंपणा च्या बाजूला बांबूची लागवड सुद्धा करण्यात आली. यार करिता सामाजिक वनीकरण सिंदेवाही चे वतीने दोनशे वृक्षांचा पुरवठा करण्यात आला.
या वृक्षारोपणात करिता तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटील मंडळी, पोलीस स्टेशन तळोधी चे संपूर्ण पोलीस कर्मचारी, परिसरातील संपूर्ण पत्रकार मंडळी, तसेच स्वाब संस्थेच्या सदस्यांच्या सामूहिक सहकार्याने आज ‘तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन परिसर’ येथे अशा विविध वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तळोधी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित सिंग देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानकर साहेब, तसेच संपूर्ण पोलीस कर्मचारी वृंद सोबतच. तळोधी बाळापूर पत्रकार संघाचे संजय आगळे , भारत चुणारकर , महेश काशीवार , राहुल रामटेके , यश कायरकर, राजेश बारसागडे , तुलूप गेडाम , इत्यादी पत्रकार तर स्वाब संस्थेचे पदाधिकारी जिवेश सयाम, अमन करकाडे शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंमले, महेश बोरकर, इत्यादी सदस्य उपस्थित होते सोबतच तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटील मंडळी उपस्थित होते.