मेहकर: भिकारी महिलेवर एका वृद्धाने घरात बोलावून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी दुपारी तालुक्यातील बार्डा येथे घडली. याप्रकरणी वृद्धाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारडा ता मेहकर
येथे भीक्षा मागण्यांसाठी गेलेल्या वरवंड येथील ४५ वर्षीय महिलेवर पीठ देण्याच्या बहान्याने घरात बोलावून ६० वर्षीय इसमाने गुरुवारी दुपारी बलात्कार केल्याची घटना घडली. संबंधित महिलेने नातेवाईकांना आपबिती सांगून रात्री जानेफळ पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी बळीराम शिवराम बार्डेकर वय ६० रा. बारडा ता. मेहकर याच्याविरुद्ध पिडीत महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.