स्वाब सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान  (वर्षभरात दिले तिनसे(३००) हुन अधिक विविध सापांना जिवदान.)  तळोधी (बा.): 

0
30

(वर्षभरात दिले तिनसे(३००) हुन अधिक विविध सापांना जिवदान.)

तळोधी (बा.): तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत वलनी गावा लगतच्या किसन सडमाके यांच्या शेतामध्ये शेतमजूर काम करीत असताना अजगर साप असल्याची माहिती संस्थेचे सर्पमित्र जीवेश सयाम यांना देण्यात आली. त्यांनी अजगराला सुरक्षित पकडून नंतर शेतकऱ्यांना अजगरा बद्दल सांगताना बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला. “कारण अजगर साप हा घोणस प्रमाणेच थोड्याफार प्रमाणात दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संखेत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर आम्हाला कळवा, मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका.” असा यावेळेस सर्पमित्र जिवेश सयाम यांनी उपस्थित लोकांना समजावले नंतर पकडलेल्या सापाची तळोधी बा. वनविभाग मध्ये नोंद करीत वनपरिक्षेत्रातील आलेवाही जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी वनरक्षक पंडित मेकेवाड यांच्या उपस्थितीमध्ये व तळोधीचे ठाणेदार अजित सिंग देवरे यांच्या समक्ष सोडला.

विशेष म्हणजे तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्र तसेच शिंदेवाही, नागभीड, वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावांमधून सुरू वर्षभरात स्वाब संस्थेच्या जिवेश सयाम, महेश बोरकर, यश कायरकर, विकास लोणबले, या सर्पमित्र सदस्यांनी तिनसे(३००) हून अधिक विषारी, बिनविषारी अशा तिनसे हुन अधिक सापांना जीवदान दिले असून. सोबतच या गाव परिसरामध्ये ‘साप सर्पदंश, मृत्यू, अंधश्रद्धा व कायदा.’ या विषयांतर्गत सापाबद्दल सतत मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम सुद्धा स्वाब संस्था राबवत असते. त्यातच आज तळोदी परिसरात एका अजगराला शेतातून सुरक्षित पकडून जंगलात सोडून जीवदान दिले. यावेळी अजगरासोबतच एक पुर्ण विकसित नाग, सुद्धा सुरक्षित आलेवाही जंगलाच्या परिसरात सोडन्यात आला. तर तळोधी जंगलात डुरक्या घोणस, मन्यार, घोणस, व धामण मुक्त करून जीवदान दिले. यावेळी संस्थेचे सदस्य यश कायरकर, जीवेश सयाम, अमन कडकडे , सचिन रामटेके , वनरक्षक पंडित मेकेवाड, पोलीस ठाणेदार अजितसिंग देवरे उपस्थित होते.

Previous articleभवनाच्या बांधकामाकरिता आमदार बंटी भांगडिया यांनी दिली मदत
Next articleचिंधी (माल) येथे स्वाब संस्थेतर्फे सापां बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम “आपले जीव वाचवण्याकरता नागमोत्याकडे (मांत्रिक) न जाता दवाखान्यातच जाऊन उपचार करा” –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here