कोहळी समाजाला दिलेला शब्द आमदारांनी केला पूर्ण
कोहळी समाज बहुउद्देशीय मंडळ तळोधी येथे कोहळी समाजाची स्वतःची जागा उपलब्ध आहे. या जागेवर समाजभवन व्हावे अशी समाज बांधवांची इच्छा होती , त्या संदर्भात लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया यांचेकडे काही दिवसांपूर्वी समाजाचे शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यावेळी आमदार साहेबांनी समाज भवनाच्या बांधकामाकरिता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आज दिनांक ३०/०६/२०२४ रोज रविवार ला चिमूर येथे समाज भवनाच्या बांधकामाकरिता धनादेश पदाधिकार्याकडे सुपूर्द केला. दिलेला शब्द यावेळी आमदार महोदयांनी पूर्ण केला. कोहळी समाजाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर येथे आज आमदार बंटी भांगडीया यांच्या निवासस्थानी धनादेश देण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष सुखदेव भाकरे, सचीव प्रभुजी मस्के, उपाध्यक्ष रमेश बोरकर,हेमंत लांजेवार माजी सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,कोषाध्यक्ष महेश काशीवार, भुपेश भाकरे, मोरेश्वर ठिकरे, वासुदेव गहाणे,धर्मराव बोरकर,प्रमोद गायकवाड, घृष्णेश्वर बोरकर, डी. टी. बोरकर सर,सुभाष बोरकर,सदा पाटील बोरकर, मुकेश बोरकर , चुकाराम काशीवार, अरुण गाहणे, दिनेश काशीवार, रविंद्र बोरकर,मारोती झोडे, दिलिप गायकवाड व इतर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी नागभीड तालुक्यातील संपुर्ण समाजाच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांये आभार मानन्यात आले.