मुल : तालुक्यातील पत्रकारांनी कृषी कार्यालया संदर्भातील बातम्या प्रकाशित करु नये. कार्यालयाची परवानगी घेऊनच बातम्या प्रकाशित कराव्यात म्हणून तालुका कृषी कार्यालयातील कर्मचा-यांनी दि २५ जुन मंगळवार ला तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन दिले. ही घटना निषेधार्थ असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर गदा आणणारी आहे त्यामुळे प्रेस क्लब मूलच्या वतीने दिनांक 28 जून शुक्रवार ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदविला व कृषी करण्यातील कर्मचाऱ्यांनी विरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे.
तालुका कृषी कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभार व सावळा गोंधळ या बाबत एका वर्तमानपत्रात कृषी अधिकारी मिळेचना! शेतक-यांनी जावे कुणाकडे? या आषयाचे वृत्त प्रकाशित केले. या बातमी मध्ये कार्यालयातील वरिष्टांचे कोट घेतले आहे. मात्र कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून पत्रकारांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया संदर्भातील बातम्या छापु नये यासाठी दबाव टाकण्याचे हेतूने कर्मचार्यांनी निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
ही बाब निषेधार्थ असून पत्रकार्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा निर्माण करणारी आहे. तसेच कार्यालयातील भ्रष्टाचार लपविण्याकरीता कर्मचार्यांनी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे.
कर्मचाऱ्यांनी असे करतांना कार्यालय प्रमुख किंवा वरिष्टांची कोणतीही परवांगी घेतलेली नाही. आपल्याच मनमानीने तालुका प्रशासनाला निवेदन देत पत्रकारांवर दवाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील कर्मचार्यांनी सेवाशर्तीचा भंग केला आहे. योग्य चौकशी करून तात्काळ बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी प्रेस क्लब मूल च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रेस क्लब चे अध्यक्ष विजय सिद्धांवार,उपाध्यक्ष सतीश राजुरवार, शशिकांत गणवीर, अमित राऊत, सचिव कुमुदीनी भोयर, नासिर खान, प्रमोद मशाखेत्री, रोहित कामडे, धर्मेंद्र सुत्रपवार, नितेश मॅकलवार, आदी उपस्थित होते.