यश कायरकर (तालुका प्रतिनिधी)
पतीने गळा आवरून पत्नीचा केला खुणाचा प्रयत्न व ती मेली समजून जंगलात पाण्याच्या पायपात फेकून दिले व निघून गेला मात्र सुदैवाने काही वेळाने पिडीत पत्नीला होश आले व ती बचावली. घोडाझरी जंगल परिसरातील घटना.
सविस्तर वृत्त, काल दि. 22 गडचिरोली जिल्ह्यातील राहनार विसोरा तालुका वडसा (देसाईगंज) जिल्हा गडचिरोली येथील युवक कार्तिक नाकाडे वय अंदाजे 28 वर्षे याने चंद्रपूर एम.आय.डी.सी. पडोळी येथे आपल्या माहेरी गेलेल्या पत्नीला वय ( 28 वर्ष) हिला मोटरसायकलने सोबत आणून दुपारी 11 वाजता नागभीड पोलीस स्टेशन हद्दीतील घोडाझरी जंगलातील चिंधी (माल) जवळील जंगलात शौचास लागण्याच्या बाहण्याने आपली मोटर सायकल जंगलात पत्नी सोबत नेली. व तिथे एक तास टाईमपास करत आपल्या मित्रांची वाट पाहिली. व काही वेळाने त्याचे तिघे अनोळखी मित्र आल्यानंतर मित्रांसोबत पत्नीला मारहाण केली व नंतर मित्रांनी पिडीत पत्नीची हात पाय पकडून ठेवले तर पती गुन्हेगार कार्तिक नाकाडे याने गळा आवळला व पत्नी मेली असे समजून त्याने जवळील एका पाण्याच्या पायपामध्ये पत्नीला टाकून पसार झाला. मात्र सुदैवाने काही कालावधीनंतर जख्मी पत्नीला होश आल्यामुळे ती कशीबशी जंगलातून नागभीड- तळोदी रोडवर आली. व तिथून लिफ्ट मागून चिंधीचक बस स्टॉप वर 12 वाजता गेली. व तेथील लोकांना तिने आपली आपबीती सांगितली.
तात्काळ गृहस्थांनी नागभीड पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधला असता नागभीड पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.पोटभरे साहेब यांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेला तात्काळ दवाखान्यात भरती केले व घटने संदर्भात गुन्ह्याची नोंद करून.व महिलेने दिलेल्या बयानावरून आरोपी कार्तिक नाकाडे याचा शोध घेणे सुरू केले. मात्र अद्याप आरोपी हा प्रसार असून आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या इतर अनोळखी तीन व्यक्तींचा ही पोलिस कसून तपास करीत असून या घटने संदर्भात लवकरच उलगडा होणार. मात्र समोरील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.