प्रेस क्लब चे प्रकाश चलाख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0
45

मूल

मुल येथील प्रेस क्लबचे सदस्य तथा दैनिक नागपूर पोस्ट (इंग्रजी) वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी प्रकाश डी. चलाख पत्रकारितेतील मॉस कम्युनिकेशन इन जर्नालिझम (एमसीजे) या परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सि. पी. अँड बेरार कॉलेज, नागपूर या अभ्यास केंद्रावरून विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

नुकताच विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात त्यांनी वरील यश संपादन केले.

प्रकाश चलाख यांनी अनेक वृत्तपत्रात कार्य केले आहेत. पत्रकारितेसोबत सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून आपल्या लेखणीतून वंचितांना न्याय मिळवून देण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. प्रकाश चलाख हे सिद्धांत महाऑनलाइन तथा ग्राहक सेवा केंद्राचे संचालक आहेत.

प्रकाश चलाख यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मित्रपरिवार तसेच हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleमूल तालुक्यात फाशी लागून इसमाची आत्महत्या 
Next articleपतीने केला पत्नीचा गळा आवळून खून, मात्र सुदैवाने पत्नीला काही वेळाने आला होश व ती बचावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here