जादुटोना संशयातून वृद्धाची हत्या..  •तीन आरोपीना अटक: नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना

0
35

जादुटोना संशयातून वृद्धाची हत्या..

•तीन आरोपीना अटक: नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना

• मार्च महिन्यात याच गावात झाल होते तिहेरी हत्याकांड

• जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गतच कारवाई करावी, आ.भा. अंनिस ची मागणी.

  1. नागभीड: ( यश कायरकर ) जादुटोणाच्या संशयावरून एका 67 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे.. तीन महिन्या पूर्वी याच मौशी गावात वडिलाने आपल्या दोन मुली व पत्नी ची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल नागभीड तालुक्यातील मौशी गावात रात्री 8 च्या दरम्यान ही घटना घडली.. मृतकाचे नाव आसाराम दोनाडकर (67) असे आहे..

प्राप्त माहितीनुसार जादूटोणाच्या संशयावरून आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. यांनतर आसाराम दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहान करण्यात आली. त्यांना बेशुद्ध होत पर्यंत मारहान करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी दवाखण्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली व तीन आरोपींना अटक केली. त्या मध्ये संतोष जयघोष मैंद (26), श्रीकांत जयघोष मैंद (24), रुपेश देशमुख (32) यांचा समावेश आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील घटनेचा तपास नागभिड पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड करीत आहेत !

*”जादूटोणा , करनीच्या संशयावरून हत्या ही आपल्या सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही व्यक्तीला जादूटोणा करता येत नाही ही अंधश्रद्धा आहे.*

*जेव्हा आपल्या घरी कोणात्याही तरुण व्यक्ती चा मृत्यू होणे, मुलं बाळ न होणे , आर्थिक अडचणी आणि आरोग्य बरोबर नसणे, या कारणांमुळे जेव्हा लोक मांत्रिक, बुवा-बाबा व अंगात येणाऱ्या स्वयंघोषित देव्या यांच्या कडे जातात, तेव्हा ह्या गावातील किंवा परिसरातील एखाद्या पुजाऱ्याचा किंवा इतरांचा नाव सांगतात त्यामुळे आधीच घरगुती संकटातून नैराश्य असलेले लोक हे बुवा बाबांनी सुचवलेल्या व्यक्तीला मारहाण करतात किंवा खून करतात. त्यामुळे या विषयांवर आळा बसण्याकरता महाराष्ट्र राज्य शासनाने 2013 मध्ये ‘जादूटोणा विरोधी कायदा 2013 मंजूर करून लागू केलेला आहे. तरी या कायद्याअंतर्गत पोलीस यंत्रणेने तपास करीत फक्त मारेकऱ्यावरच नाही तर या घटनेमध्ये मारेकर्‍याला नाव सुचवणाऱ्या कुणीतरी तांत्रिक बुवा बाबा असेलच त्याच्यावरही सक्त कारवाई करावी.”

Previous articleगुणवंतानी व्यावसायीक क्षेत्राचाही करियरसाठी विचार करावा संवर्ग विकास अधिकारी राठोड यांचे आवाहन
Next articleगावागावांत जादुटोणा विरोधी कृती दल स्थापन करा.  -हरिभाऊ पाथोडे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here