मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे गिरगाव ता.नागभिड येथे रात्री 09.00 वा चे सुमारास अवैध रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर क्र. एम एच 32 ए 1438 वर कार्यवाही करण्यात आली. आरोपी नामे संदिप घनश्याम गहाणे वय 33 वर्षे रा.गिरगाव व आरोपी नामे घनश्याम केशव गहाणे वय 57 वर्षे रा.गिरगाव यांचे वर तळोधी पोलीस स्टेशन अपराध क्र. 102/24 कलम 379, 34 भादवि सहकलम 130/177, 130(1) /177 मोवाका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार सहाय्यक पो निरीक्षक अजितसिंग देवरे यांचे सुचनेनुसार पो.उपनिरीक्षक किशोर मानकर ,सफौ नैताम ,पो.हवालदार भानारकर,पो.हवा. सिडाम ,ना.पो.शिपाई साखरकर ,पो.शि. अमर पिद्दुरकर अशांनी केली आहे. पुर्वी सुद्धा बाळापूर, तळोधी, वाठोणा परिसरात अनेक ठिकाणी कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाही मुळे अवैध वाळू उपसा व तस्करी करणारे धास्तावले आहेत.