प्रेस क्लब मूलच्या वतीने उद्या (दिनांक २१ जून) सकाळी ११ वाजता गुणवंताचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मूल पंचायत समितीच्या सभागृहात मुल तालुक्यातील माध्यमिक शाळांत परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यानिमित्ताने केला जाणार आहे.
मूल तालुक्यातील 18 माध्यमिक शाळांमधून, प्रथम आणि द्वितीय आलेल्या सर्व गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांग मधून गुणवंत विद्यार्थ्यांचा हे सत्कार करण्यात येणार आहे. मुल येथील तनवी कैलास चालक हीची आयआयटीमध्ये प्रवेशासाठी पात्र झाल्याने तिचाही सत्कार प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास तहसीलदार मृदुला मोरे, संवर्ग विकास अधिकारी राठोड, वनपरिक्षेत्राधिकारी कारेकर, गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, स्नेहबंध चे कार्याध्यक्ष निलेश राय, साईबद्देशीय संस्थेचे विवेक मुत्तेलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.