- मुल:- एमआयडीसी मरेगाव परिसरात जी.आर.कृष्णा फेरो अँड आलाय कंपनीच्या जवळ मोठ्या प्रमाणावर अवैद्य रेतीसाठा आहे. सदर रेतीसाठा विषयी माहिती जाणून घेतली असता जी.आर. कृष्णा फेरो अँड अलाय कंपनी परिसरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे ५० हायवा रेतीसाठा करून ठेवला आहे. सदर कंत्राटदाराने या रेतीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अथवा शासनाकडून परवानगी घेतलेली नाही. याविषयी दिनांक *आठ जून 2024 ला तहसीलदार साहेब यांना मोबाईल द्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तक्रार स्वरूपात माहिती तथा रेतीसाठ्याचे व्हिडिओ क्लिप पाठवली असता तहसीलदार यांचे कडून अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून महसूल विभाग विषयी शंका निर्माण होण्याला कारणीभूत ठरते. संबंधित कंत्राटदार आणि महसूल मध्ये साठे-लोटे असल्या चे यावरून बोलता येऊ शकते.एकीकडे घरगुती घरकुल बांधकाम करणाऱ्यांना किंवा इतरही शासकीय काम करणाऱ्यांना रेती उपलब्ध होत नाही. गरीब गरजू लोकांना घरकुल मंजूर झाले असताना रेती अभावी त्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे अर्धवट आहेत. शासनाच्या उद्देशांना हरताळ असणारी ही व्यवस्था आहे. आणि दुसरीकडे अशा कंत्राटदारांकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठा उपलब्ध असणे व्यवस्थेतील त्रुट्या दर्शवितात. या संबंधाने शिवसेनेच्या वतीने आज दीं.१८/६/२०२४ तक्रार दिलेली असता.ही बाब अतिशय निषेधार्थ आहे. आम्ही शिवसैनिक आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतोय की, सदर रेती साठ्याबाबत संबंधित कंत्राटदाराविरोध तात्काळ शासकीय नियमानुसार कठोरातील कठोर कारवाई करून सदर रेती साठा जप्त करावा आणि ही रेती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. आपणाकडून सदर विषयावर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेना तालुका मूलच्या वतीने आपल्या शिवसेना स्टाईलने सदर प्रकरण हाताळल्या जाईल आणि यात कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहणार.असा इशारा यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी दिला.यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश राम,युवासेना शहर प्रमुख आमित आयलानी,दादाजी लोडेलिवांर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.