प्रतिक्रिया..
बलात्काराची घटना अहमदनगर जिल्ह्यात 24 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला ही असो किंवा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस ची. निरागस मुलीवर इतक्या अमानुषपणे बलात्कार करून घडलेला हत्याकांड असो…. राज्य कोणतं ही असो, सरकार कोणाची ही असो ह्या गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडच्या आहेत.
अशा घटना घडायलाच नको पण आपल्या समाजाचं दुर्दैव की या घडतात व नेहमी नेहमी घडतात. पण योगीजी यांची आतापर्यंत ची कार्यप्रणाली पहिली तर स्त्रीत्व ते जपतील, त्यांचं राज्यात स्त्री अशी लज्जित, हारु नाही देणार आहेत ते, मला एक आस आहे की उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या घटना तिथ सहन केली जाणार नाही, न्याय मिळेल.
त्या राज्यातील जनता तिला न्याय मिळावा यासाठी लढतील. माझं तर मत आहे आता कायदेशीर कारवाई नकोच, हे लोक गजाआड नकोत. यांच्या शरीरात भर चौकात आता गज आडवे हवेत.
पण माझ्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचं काय… या 4, 5 महिन्यांत कॉरॅन्टाईन सेन्टर वर सतत घडत आलेल्या बलात्काराच्या घटनांचं काय! त्यांच्या साठी कोण न्याय मागणार की सत्ताधारींनी कानाडोळा करायचा व विरोधकांनी आवाज उठवत राहायचं…
की शिवबाच्या राज्यात त्यावर राजकारण करण्यातच धन्यता मानली जाणारं आहे… शिवबाचे नाव फक्त सत्ता स्थापन करण्यापुरतेच वापरणार आहेत का?
उत्तर प्रदेश च जे होईल ते होईल, पण महाराष्ट्रात राजरोसपणे सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने माझ्या महाराष्ट्रातील बहिणींच्या सुरक्षेच् पहावं… हीच विनंती.
सौ. सपना राऊत
उपाध्यक्ष, महिला आघाडी, भाजपा
पातूर जि. अकोला