डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवाडा अंतर्गत जनकापूर येथे किसान दिन

0
65
  •  (बा.) तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तळोधी मंडळ कृषी अधिकारी पी एस शिंदे यांच्या नियोजनानुसार पीएम किसान उत्सव दिन जनकापूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी खरीप पूर्व हंगाम नियोजन, बियाणे खरेदी करतेवेळी घ्यावयाची काळजी, पीएम किसान योजनेचे निकष आदि विषयांवर मार्गदर्शन पी एस शिंदे मंडल कृषी अधिकारी, तलोधी बा. यांनी केले. जमिनीचे आरोग्य, धान पीक लागवड तंत्रज्ञान, धान पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आदी विषयांवर एस ए पाकमोडे कृषी पर्यवेक्षक तलोधी बा. यांनी मार्गदर्शन केले. धान पिकातील बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, पीएमएफएमई आदी विषयांवर सी एस दाडगे कृषी सहायक, जनकापुर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित गावचे पोलिस पाटील प्रीतम मेश्राम, कृषीमित्र राहुल रामटेके यांनी गावातील शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली उत्पादकता वाढवावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमास उपस्थित जी पी टेंभूर्णे कृषी पर्यवेक्षक, उपसरपंच महेश रामटेके, से.स.अध्यक्ष अशोक बोरकर, राकेश काशिवार,सुरेश डाहारे, ब्रम्हदास शेंडे, तसेच गावातील सर्व पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनितेश मॅकलवार व प्रणित पाल यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा 
Next articleएमआयडीसी मरेगाव परिसरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीसाठा करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here