मूल येथील भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचे मूल शहराध्यक्ष तथा धनगर युवासेना मुलचे युवा नेतृत्व नितेश मॅकलवार व युवा क्रांती संघटना तथा युवा कुणबी सेनाचे विद्यमान अध्यक्ष प्रणित पाल यांच्या वाढदिवस रविवारला विविध कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला.या निमित्ताने स्थानिक सरकारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्किट व छोट्या मुलांना चॉकलेट वितरण करण्यात आले.वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मूल नगरीतील कर्मवीर कॉलेज मैदान परिसरात प्रणित पाल व नितेश मॅकलवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले व या वेळी त्यांचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते पिंटू चिलमुलवार, सौरव भोयर, विनीत कटपल्लीवार,अजिंक्य लोखंडे,दत्तात्रय समर्थ,राकेश मोहुर्ले, पिंटू पिंपळे, आकाश आरेवार, कैलाश कंकलवार,सचिन आंबेकर,ओमकार महाजनवार, विनोद मिडपलीवार, पंकज चौधरी मल्लेश यारेवार, विक्की जुक्कलवार, मनोज मोहुर्ले, डेव्हिड खोब्रागडे आदि मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होते.