आज दि.15.06.2024 रोजी सकाळी 06.00 वा चे सुमारास सावरगाव बस स्थानकाजवळ एक ईसम संशयितरित्या फिरत असतांना त्याचा संशय आल्याने लोकेश पंतुजी राउत रा.सावरगाव या तरुणाने त्यास बोलण्यात गुंतवुण ठेवले व सामाजिक कार्यकर्ते /पत्रकार भारत चुनाकर यांचे मदतीने लागलीच तळोधी पोलीसांना माहीती देवुन बोलावुन घेतले. सदर तरुणास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यास पोलीस खाक्या दाखवुन माहीती घेतली असता त्याचे नाव राजु बालाजी दुर्वे रा.धामणगाव चक ता.नागभिड असे असुन तो अट्टल चोरटा आहे. त्याने आज सकाळी एच. पी. पेट्रोलपंप ,सावरगाव जवळुन 2 ट्रक चालकांचे मोबाईल चोरल्याचे कबुली दिलेली आहे. तक्रारदार नामे सुरेशकुमार दुजैई गौतम वय. 35 वर्षे रा. नरहन गौंडा , लक्खा बौंदी ता.महसील जि. बवराईच , उत्तर प्रदेश यांचे तक्रारीनुसार तळोधी पोस्टे अप क्र. 96/24 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडुन 02 मोबाईल व स्प्लेंडर मोसा क्र. एम एच 34 व्ही 225 जप्त करण्य़ात आलेली असुन त्यास अटक करण्यात आलेली आहे.