Home चंद्रपूर राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून दोन उत्कृष्ट शिक्षकांची निवड
- चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघ प्रणित “शिक्षक सन्मान अभियान” अंतर्गत “राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा” 16 जून 2024 ला अमरावती येथे अभियंता भवनात आयोजित करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्या साठी चंद्रपूर जिल्ह्यातून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे श्री. रामकृष्ण श्रीधर महाडोरे, प्रा . शि. जि. प. प्राथमिक शाळा, रुद्रापुर पं. स. सावली व श्री. तुकाराम यादव धंदरे, प्रा. शि. जि. प. प्राथमिक शाळा आसन खुर्द, पं. स. कोरपना यांची निवड करण्यात आलेली आहे.हाराष्ट्रातील शिक्षक व समाज बंधु भगिनींनी या विद्यार्थी, शिक्षक व समाज हिताच्या दृष्टिकोनातून आयोजित सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन “शिक्षक सन्मान अभियान” प्रणित “विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच जिल्हा चंद्रपूर” च्या जिल्हाप्रमुख प्रा. रत्नमाला भोयर यांनी केले आहे.
© All Rights Reserved