जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळोधी वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम

0
23
  • तळोधी बा.;
    आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र व स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने विविध पर्यावरण पूरक कार्यक्रम राबविण्यात आले.
    यामध्ये तळोदी बा. वनपरिक्षेत्रातील सावरला गावाच्या मंदिर परिसरात व रस्त्याच्या बाजूच्या पडीत जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आलेवाही जंगल परिसरामध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले. सोबतच गिरगाव नियत क्षेत्र मध्ये सुद्धा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच लोकांना वाढलेले तापमान आणि वातावरणावर नियंत्रण ठेवण्याकरता वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.
    यावेळी तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार , क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, पदाधिकारी जिवेश सयाम, कैलास बोरकर, सुरज गेडाम, गिरीधर निकूरे, नितीन भेंडाळे, शुभम सुरपाम, शुभम निकेश्वर, अमन करकाडे, सुमित गुरनूले, इत्यादी सदस्य, सावरला येथील वन समितीचे अध्यक्ष यशवंत खोब्रागडे, समितीचे सदस्य व गावकरी महिला आणि वन चौकिदार देवेंद्र ऊईके, वनमजूर उपस्थित होते.
Previous articleवेगळ्या पद्धतीने साजरा केला सातवा महिना
Next articleशिक्षक भारती संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here