मूल येथील नामांकीत नवभारत कन्या विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून, कु. अनुष्का प्रविण ठावरी हिने 96.20 टक्के गुण घेत घवघवीत यश मिळविले आहे. यावर्षी नवभारत कन्या विद्यालयाचे 8 विद्यार्थीनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाल्यात हे उल्लेखनीय. विद्यालयाचा निकाल 92.41 टक्के लागला आहे.
कु. अनुष्का प्रविण ठावरी (96.20) टक्के, कु. वैष्णवी प्रमोद चटारे (93.20) टक्के, कु. लिना गोपीनाथ शेंडे (93.20) टक्के, कु. कोमल चंदू त्रिपत्तीवार (92.00), कु. जानवी सचिन चौखुंडे (91.60) कु.दिक्षा संजय जवादे (90.800), कु. अक्षरा संजय बावणे (90.20), अक्षरा संजय बावणे (89.60) यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
या विद्यालयातील 11 विद्यार्थीनी 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. तर 70 टक्के पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थीनीची संख्या 20 आहे. 39 विद्यार्थीनी 60 टक्केपेक्षा अधिक गुण घेवून प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. 47 विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत तर 10 विद्यार्थीनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
नवभारत कन्या विद्यालय ही मूल तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असून, दरवर्षीच या शाळेचा निकाल दर्जेदार लागत असतो. गुणवंत विद्यार्थीनीच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे, सचिव अनिल वैरागडे, मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.