मुल शहरातील आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य,नागरिकाचे आरोग्य धोक्यात

0
48

मुल शहरातील आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य,नागरिकाचे आरोग्य धोक्यात

( *वॉर्ड न 17 मधील नागरिकांनी केली निवेदनातून प्रश्न सोडविन्याची मागणी* )

मुल शहरात सौदर्याला भर टाकणारे सुसज्ज आठवडी बाजार तयार झाले
मात्र शेजारील वस्तीतील नागरी वसाहती मध्ये याच आठवडी बाजार मुळे अनेक नाहक त्रास सहन करावे लागत असल्याचे चित्र आज बघायला मिळत आहे,
आठवडी बाजारातील घाणीचे पाणी योग्य निपटारा होत नसल्याने शेजारील वस्तीच्या बाजूला जमा राहत असल्याने दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे व आठवडी बाजारातील रोगाला प्रवृत्त करणारा कचरा सदर वस्तीला लागून असणाऱ्या सुरक्षा भिंतीजवळ साठवणूक केली जात आहे, सदर आठवडी बाजार शेजारी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,
सदर प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी वॉर्ड न 17 मधील नागरिकांनी पवार साहेब यांना निवेदनातून सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी निवेदन देण्यात आले,
यावेळेस निवेदन देताना
प्रणय बेंदले,सचिन आंबेकर,राकेश मोहुर्ले, दादाजी येरणे,अतुल मडावी, विक्की बोंडगुलवार,वनिता मडावी,मेघा चीमुरकर, माया मानकर ,बंडू पाल, सुरेश कोल्हे ,नितेश मॅकलवार उपस्थित होते.

Previous articleडॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे समीरचा जीव गेला नातेवाईकांचा आरोप
Next articleनवभारत कन्या विद्यालयाची अनुष्का ठावरी तालुक्यात प्रथम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here