आज रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे रेती या गौण खनिजाची चोरटी वाहतुक करण्याविरोधातं कारवाई करण्यात आलेली आहे. आज रोजी तळोधी पोस्टे ईमारत समोर अचानक नाकांबदी करुन रेती ची विनापरवाना वाहतुक करणारे हायवा ट्रक क्र. 1) टाटा कंपनिचा हायवा ट्रक क्र. MH 40 CM 6664
2) टाटा कंपनिचा हायवा ट्रक क्र. MH 40 CM 6864
3) अशोका लेलॅन्ड कंपनिचा हायवा ट्रक क्र. MH 40 AK 9891 असे 3 हायवा ट्रक व त्यातील 17 ब्रास रेती , चालकांचे मोबाईल फोन असा एकुण 46, 30,000/- रु. कि. चा मुद्देमाल* पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वाहन चालक नामे आ.क्र. 1) शुभम पुंडलिक मेश्राम वय. 23 वर्षे व्यवसाय – चालक रा.मौजा सोनेगाव ता.कुही जि.नागपुर
2) निखील शंकर नेवारे वय. 25 वर्षे रा.मौजा सुरगाव ता.उमरेड जि.नागपुर
3) मयुर पालकराज गोंगल वय. 22 वर्षे व्यवसाय – चालक रा. रा.चिखमारा ता.नागभिड जि.चंद्रपुर आणी वाहन मालक अनुक्रमे
4 ) नामे श्री.शैलेंद्र उर्फ जितु कवडुजी वैद्य रा. पाचगाव ता.उमरेड जि.नागपुर
5) गणेश यशवंत जुनघरे रा.परदेशी मोहल्ला,कावरापेठ ,उमरेड जि.नागपुर अशा 5 आरोपीतांविरोधात तळोधी पोस्टे अप क्र. 65/24 कलम 379,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असुन हायवा चालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर कारवाई ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे , पोउपनि किशोर मानकर ,पोउपनि चंद्रकांत लांबट , पोहवा / विजय वाकडे , पोशि / राहुल चिमुरकर , चापोशि / श्यामलाल कोडापे अशांनी केलेली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि किशोर मानकर हे करित आहेत.