मूल:-तब्बल 13 दिवसानंतर समीरची मृत्यूशी झुंज संपली.
13 एप्रिल 2024 शनिवारी चिरोली- केळझर फाट्याजवळ समीर विजय कस्तुरे ( 17, रा. आगडी ) याचा अपघात झाला. अपघातात तो गंभीर जखमी झाला. कांतापेठ इथून समीर कस्तुरे हा युवक एम. एच. 34 ए. वाय. 8640 क्रमांकच्या दुचाकीने मित्राला चिरोली येथे सोडून गावाकडे परत जात होता. दरम्यान जानाळ्या कडून चिरोली मार्गाने येणाऱ्या एम. एच. 34 बी. व्ही. 4711 क्रमांकच्या कारला दुचाकीने धडक दिली. यात समीर कस्तुरे हा गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथिल खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दि. 23 एप्रिल ला नागपुर येथील एम्स हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. एम्स येथिल डॉक्टरांनी थातूरमातूर इलाज करून 24 एप्रिल ला रुग्णाला घरी रवाना केले. नातेवाईकांनी डिस्चार्ज बद्दल विचारले असता समीर आता ठीक आहे त्याला तुम्ही घरी नेऊ शकता असे डॉक्टरांकडून उत्तर मिळाल्याने समीरच्या नातेवाईकांनी त्याला घरी आणले. 25 एप्रिल दुपारी 3 वा. समीरची प्राणज्योत मालावली. समीरची तब्येत चिंताजनक असताना डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज का दिला? असा प्रश्न समीरच्या नातेवाईकांना पडला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे समीरचा जीव गेला, असा आरोप समीरचे नातेवाईक तसेच मित्रांकडून केला जात आहे. समीर हा मुल तालुक्यातील आगडी येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगा होता. तो इयत्ता बारावीचे शिक्षण कर्मवीर महाविद्यालय येथे घेत होता. समीरचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील होता. समीर हा नेहमी प्रत्येकांना हसवण्याचा प्रयत्न करायचा असा अचानक निघून गेल्याने सर्वत्र हड हड व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या पश्चात आई वडील, बहिण तसेच बराच मोठा कस्तुरे परिवार आहे. आज आगडी येथिल त्याचा रहात्या घरून 11 वा. अंतयात्रा निघणार आहे.