चंद्रपुर – गडचिरोली दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष कार्यालय मूल येथे सदिच्छा भेट दिली. सदर कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सुनील भूसारा, युवा नेते रविकांत वरपे,चंद्रपुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युवा नेते आमदार रोहित पवार यांनी सदर भेटीत कार्यकर्त्यांना लाख-मौलाचे मार्गदर्शन उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले . चंद्रपुर लोकसभा निवडणूकीचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना निवडून आणण्याकरिता अहोरात्र मेहनत करून सहकार्य करावेत. निवडून आल्यास हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाराष्ट्रात कमीत-कमी 35 खासदार निवडून येतील असा विश्वास दर्शविला. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी धर्म मनातून निभावला पाहिजे.
सर्व पधिकार्यांनी एकजुटीने निवडणुकीत मेहनत करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याकरिता अहोरात्र मेहनत करावेत असा संदेश देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी रोहित दादा पवार यांना शब्द दिला की, सदर लोकसभा निवडणुकीत मनःपूर्वक जीव लावून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करूत अशी सर्वांच्या मुखातून एकवाक्यता निघाली.सदर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठक यशस्वी होण्याकरिता युवाजिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ, तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुकाध्यक्ष नीता गेडाम, शहर महिलाध्यक्ष अर्चना चावरे, मूल युवा त प्रमुख रोहिदास वाढई, गुरुदास गिरडकर ,प्रभाकर धोटे, अजय त्रिपट्टीवार , कृष्णा ठिकरे , दिनेश जिडडीवार , प्रतिभा मारगोनवार , दुशांत महाडोळे, प्रदिप देशमुख , प्रशांत भरतकर, चंद्रदीप शेंडे, गणेश एडणूतलवार प्रामुख्याने सहकार्य केले.