राज्यातील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या; खामगाव एसडीपीओ प्रदीप पाटील यांची पांढरकवडा येथे बदली

0
538

मुंबई: राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील १०५ पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने ३० सप्टेंबररोजी काढले.
यामध्ये खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा येथे एसडीपीओ म्हणून बदली झाली आहे. प्रदीप पाटील यांनी लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी खामगाव विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली हे विशेष.

  • बुलडाणा जिल्ह्यातील 5 पोलिस अधिकाऱ्यांची बदली
    डॉ. संदीप गुलाबराव पखाले, 
    अपर पोलिस अधीक्षक,बुलडाणा येथून पोलिस उपआयुक्त,नागपुर शहर

प्रदीप पाटील,
उपविभागीय पोलिस अधिकारी,खामगांव येथून उपविभागीय पोलिस अधिकारी,पांढरकवडा जि. यवतमाळ,

श्रीमती प्रिया ढाकने
उपविभागीय पोलिस अधिकारी,मलकापुर येथून सहायक पोलिस आयुक्त,नागपुर

भीमराव नलावडे
उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगांव राजा येथून सहायक पोलिस आयुक्त,नागपुर

सुनील विष्णु पवार,
पोलिस उपअधीक्षक,जात प्रमाणपत्र पडताळणी समिति,बुलडाणा येथून सहायक पोलिस आयुक्त,पुणे शहर

  • नवीन येणारे अधिकारी 

अमोल विलास कोळी,
उपविभागीय पोलिस अधिकारी,पांढरकवडा जि. यवतमाळ येथून उपविभागीय पोलिस अधिकारी,खामगांव

सुनील परसराम सोनवणे,
उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोट जि.अकोला येथून उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगांव राजा

विठ्ठल यमावार
उपविभागीय पोलिस अधिकारी, गडचांदूर जि.चंद्रपुर येथून उपविभागीय पोलिस अधिकारी, मेहकर

Previous articleओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा- माळी महासंघ
Next articleरक्ताचे नाते जपा ! बुलडाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here