विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

0
441

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

मुल (जिल्हा चंद्रपूर): मुल येथील वार्ड क्रमांक 7 मधील मरार मोहल्ला येथील एका 45 वर्षीय इसमाने आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. भास्कर नागोसे (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

घटनेची माहिती अशी की, भास्कर नागोसे यांनी घरात कोणीही नसताना घरातील काही कापडी वस्तू जाळून घेतल्या आणि त्यानंतर घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास मुल पोलीस करत आहेत.

 

मृत व्यक्तीच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे.

Previous articleसंत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहा समस्त कुणबी समाज बंधू भगिनी यांचे आग्रहाचे आवाहन
Next articleचांदापूर येथे शिवजयंती महोत्सव सोहळा उत्साहात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here