अकाेलाः हिंगणा रोड वरील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे पाच दिवसीय अटळबुट कॅम्प पूर्ण झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ताराज विद्यासागर, श्री स्वप्निल मेहेसेर व कपिल बजाज यांची उपस्थिती होती.
शालेय प्रशासकीय अधिकारी श्री राजेश कुमार कड यांनी विद्यार्थ्यांना एटीएम अटळ (टिकंरिंग लॅब)बद्दल संबोधित केले. अशा वैज्ञानिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच कोडींग रोबोट व बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे थोडक्यात महत्व व उपयोग सांगितले. या पाच दिवसीय कॅम्प मध्ये घनश्याम पुरहाड सर यांनी ज्या बेसिक गोष्टी शिकवल्या त्यावरून मुलांनी समाजातील समस्या सोडवण्याच्या हेतूने प्रोजेक्ट केले. यात सात गटांनी सात मॉडेल्स तयार केले. कार्यक्रमाचे मुख्य पावणे श्री विद्यासागर सर यांनी सर्व सात गटांचे परीक्षण करून त्यांच्या मॉडेल्समध्ये नाविन्यता काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. व परीक्षकांनी परीक्षण करून दोन गटांना विजयी घोषित केले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या विजयी गटांला चषक देण्यात आले. क्रमांक पटकावणारे गट आहेत.
पहिला क्रमांक -एपीजे कलाम गट
प्रोजेक्ट – स्मार्ट पार्किंग
द्वितीय क्रमांक- हॉकिंग गट
प्रोजेक्ट – वायरलेस डिजिटल नोटीस बोर्ड
सूत्रसंचालन शाळेचे लॅब इन्चार्ज पवन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अटल इन्चार्ज भानुदास तिव्हाळे यांनी केले . या कार्यक्रमात निवड झालेले ४५ विद्यार्थी व ५० पालकांचा सहभाग होता.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार कड उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया विज्ञान विभाग प्रमुख अनघा लोथे, अटळ इन्चार्ज भानुदास तिव्हाळे, पवन देशमुख, संगीत विभाग प्रमुख राहुल वानखडे, आर्ट विभाग प्रमुख रवींद्र काळपांडे यांच्यासह अनेकाचे सहकार्य लाभले.