अकोला :मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयात व सिंचन तलाव/साठवण तलाव/पाझर तलाव/गाव तलाव/को.प.बंधाऱ्यामध्ये गावातील तसेच शहरातील नागरीक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. गणेशमूर्ती विसर्जनात मूर्ती व निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी जलाशयात तसेच सिंचन तलाव/साठवण तलाव/पाझर तलाव/गाव तलाव/को.प.बंधाऱ्यामध्ये गणेशमुर्ती विसर्जन करू नये असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशय व सिंचन तलाव/साठवण तलाव/पाझर तलाव/गाव तलाव/को.प.बंधाऱ्यामधील पाणी शहरासाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी वापरण्यात येते. गणेशमुर्तींच्या विसर्जनामुळे व निर्माल्यामुळे जलप्रदूषण होते.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच जलाशयातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जीवीतहानीच्या घटनादेखील घडतात. जलाशयालगतच्या भागात वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारीही ग्रांमपचायतींकडून होत आहेत.मृद व जलसंधारण विभागाचा धरणांचा परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने सिंचन तलाव/साठवण तलाव/पाझर तलाव/गाव तलाव/को.प.बंधाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये, याकरीता जलाशयामध्ये व धरणांमध्ये गणेशमुर्ती विसर्जन करू नये आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागामार्फत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले आहे.