वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करुन मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे विविध विविध खेळाचे प्रदर्शन,स्पर्धा आयोजित करुनखेडाळू व प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.
जयंतीनिमित्त ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. अकोला हॉकीचे सचिव धीरज चव्हाण, खो-खो चे रवि रामटेके, बॉक्सिंगचे गजानन कबीर, पोलीस भरती प्रशिक्षक अनिल कांबळे, सतिशचंद भट, चारुदत्त नाकट, बॉक्सींगचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेडाळू अजय पेंदार, साक्षी गायधने, साहिल सिद्दीकी, हरिवंश टावरी, खेडाळूंचे पालक आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बॉक्सिंग, कुस्ती, खो-खो, हॉकीचे प्रदर्शनी सामने आयोजित केले होते. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोलाचे कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थी मुले मुली यांना जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी फिटनेसबाबत मैदानावर जाऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी महेश पवार,गजानन चाटसे, वाठोरे, राजू उगवेकर, अजिंक्य घेवडे, प्रशांत खापरकर, राधाकिशन ठोसरे, निशांत वानखडे यांनी परिश्रम घेतले.