वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: 19 वर्षीय युवकाने (सोपान उर्फ स्वप्नील भिकाजी पवार) याने मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पातूर पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पॉस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक डी.सी.खंडेराव यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता दीपक गोटे यांच्या युक्तिवादाच्या आधारे व साक्षीदारांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला कलम 354 डी अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पोस्को कलमान्वये 3 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. रु. भरण्याचे आदेश दिले.दंडाची रक्कम न भरल्यास आरोपींना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सुनावणीदरम्यान महिला पोलीस कर्मचारी प्रिया शेगोकार, रत्नाकर बागडे यांनी सहकार्य केले.