व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रवादीचे बोलघेवडे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून त्यांचे स्वतःचे याबाबत ज्ञान किती कमी आहे किंवा जे सत्य आहे ते संभाजी ब्रिगेड च्या पुस्तकात वाचायला मिळालं नाही हे दाखवून दिलं. आपली पात्रता नसतांना आणि काही गोष्टींचे ज्ञान नसतांना फुकट प्रसिद्धीसाठी तोंडाला येईल ते आरोप करू नये असा सल्ला भाजप सोशल मिडिया अकोला महानगर संयोजक अक्षय जोशी यांनी दिला आहे.
अक्षय जोशी म्हणतात, मिटकरी साहेब.. आधी तुमच्या पक्षाचा व मित्र पक्षाचा इतिहास नीट समजून घ्या आणि राष्ट्रीय ध्वजाचा ध्वजारोहण करण्याचा अधिकार हा खाजगी संघटना, सर्व सामान्य नागरिक आणि खाजगी संस्था यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दिला आहे. तुम्ही नाही त्यामुळे आरोप करण्या आधी सत्य नीट वाचून घ्याल. आरएसएस असो की अन्य संघटन, सर्वसामान्य नागरिक, खाजगी संस्था अश्या सर्वाना 2002 पूर्वी ध्वजारोहण करण्यास प्रतिबंध होता. 26 जानेवारी 2002 पूर्वी कोणत्याही खाजगी संस्था, सार्वजनिक ठिकाण व सर्वसामान्य जनतेला ध्वजारोहण करण्यास प्रतिबंध होता. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला तिरंगा हा भारताचा 🇮🇳 राष्ट्रध्वज असेल असे ‘झंडा अधिनियम भारत’ असा कायदा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून देशात खाजगी संस्था, सार्वजनिक ठिकाणं, सर्वसामान्य नागरिकाना ध्वजारोहण करण्यास प्रतिबंध होता.
26 जानेवारी 2002 ला तत्कालीन स्वर्गीय अटल बिहारी वाजपायी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या NDA सरकारने ‘झंडा अधिनियम भारत’ यात बदल करून, ‘झेंडा अधिनियम 2002’ असा दुरुस्त केला. झेंडा अधिनियम 2002 च्या भाग दोन मध्ये सर्वमान्य जनतेवरील असलेला प्रतिबंध हटवला.त्याच बरोबर खाजगी संस्था, संघटना, सार्वजनिक ठिकाण, सोसायटी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यास असलेला प्रतिबंध हटवला. त्यामुळे तुम्ही लावलेले आरोप खोटे असून फक्त राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने आपण चुकीचे आरोप केलेत हे मान्य करा व जनतेची माफी मागा असा इशाराही अकोला भाजपाच्या वतीने भाजप सोशल मिडिया अकोला महानगर संयोजक अक्षय जोशी यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला आहे.