Home मूल माजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपात..
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: बाळापुर मतदार संघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारे व भारिप बहुजन महासंघाचे दहा वर्ष प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार बळीराम सिरस्कार हे भाजपात प्रवेश करणार आहेत. येत्या २० ऑगस्टरोजी अकोला येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात ते प्रवेश घेण्याचे निश्चित झाले आहे.
अकोला पूर्वचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात त्यांनी मुंबईत आज दि. ११ ऑगस्टरोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपाचे राज्यस्तरीय नेतृत्वासोबत चर्चा केली.
कर्तव्यदक्ष व स्वच्छ चारित्ऱ्याचे बळीराम सिरस्कार यांच्या प्रवेशाच्या बातमीनेच बाळापूर मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकडे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते तेजराव थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे. संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या संख्येने असणाऱ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे संपूर्ण विदर्भात भाजपाची ताकद वाढणार आहे. अकोला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष व लोकप्रिय नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे व बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात बळीराम सिरस्कार यांनी भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे. बळीराम सिरस्कार यांचे भाजप प्रवेशामुळे अकोला जिल्ह्यात आधीच कमकुवत असणाऱ्या राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे हे निश्चित.
© All Rights Reserved