विशेष पोलिस पथकाचा क्रिकेट सट्यावर छापा; आरोपीसह १ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
93

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: भारत वेस्टइंडीज T 20 क्रिकेट मॅचवर घरामध्ये सट्टा चालवणा-या इसमास जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दि. ७ ऑगस्टरोजी रात्री ९ वाजता अकोला शहरातील जठारपेठ भागातील केला प्लॉटमधील हेडगेवार रक्तपेढीजवळील घरात करण्यात आली. आरोपी हा हारजीतवर जुगार खेळवतांना आढळून आला. त्याच्याकडून १ मोठा LED TV, रिमोट, जुगाराचे साहित्य, 06 मोबाइल, नगदी 60,000 रुपये, इतर चिट्ठयापट्टया, एकुन 1,32000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास खत्रिशिर खबर मिळाली की, हेगदेवार रक्तपेड़ी जवळ एक इसम आपल्या घरात भारत वेस्टइंडीज दरम्यान चालणाऱ्या T20 मैचेस वर पैसे लावून हरजितवर जुगार खेलवित आहे. या माहीतीच्या आधारे विशेष पोलिस पथकाने 2 पंचासमक्ष छापा मारला असता आरोपी मोहित शंकरलाल शर्मा (वय 30) रा केला प्लॉट जठारपेठ येथे आपल्या घरात TV लावून मोबाईलच्या साहाय्याने लोकाकड़ूंन पैसे स्विकारुन जुगारावर हारजीत करताना मिळून आला. त्याचे जवळून 1 मोठा 55 इनचेस TV, रिमोट, 06 मोबाइल , पैसा हिशोबाचे चिट्ठया कागदपत्र, एक्सटेंशन बॉक्स, D2H बॉक्स, ऎसे 1,32,000 रूपयांचा मुद्देमाल जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबन्धक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने केली.

Previous articleमानव पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका विद्यार्थीनीसह 3 विद्यार्थी बेपत्ता
Next articleमाजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here