दहिहांडा पोलिसांसह, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकामार्फत युवकाचा शोध सुरु
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पुर्णा नदी पात्रात एका २५ वर्षीय युवकाने उडी मारल्याची घटना आज दि. ५ आॅगस्टरोजी संध्याकाळी घडली. उडी घेतलेल्या युवकाने आपली गाडी,मोबाईल, आधार कार्ड,पुलावरच ठेवले. या आधारावरुन उडी घेलेला युवक हा अक्षय गजानन ताथोड वय अं. (25) वर्षे विश्वकर्मा नगर मोठी उमरी अकोला येथील असल्याचे पोलिसांना कळाले. हा युवक हा खाजगी इलेक्ट्रिशीयन असुन तो होतकरु व मेहनती असल्याचे त्याच्या शेजारच्यांनी सांगितले. त्याला दोन बहिणी आहेत. त्याने पुर्णेच्या पात्रात उडी घेण्यामागे नेमके कोणते कारण आहे याचा शाेध पोलिस घेत आहेत. शिवाय त्याचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान सुद्धा नदीकाठी पोहचले आहेत. हा युवक पुर्णानदीच्या परीसरात कुठे आढळून आल्यास तात्काळ दहिहांडा पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.