व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या पूरपरिस्थिती मुळे बळीराजा अडचणीत असून, कृषी सेवा केंद्र चालक त्यांच्या संघटनेचा दुरुपयोग करून झुंडशाही चालवत आहेत, आणि याचा त्रास सर्वसामान्य शेतकरी याना होत आहे, कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद ठेवून शेतकऱ्यांना त्रास दिल्यास शेतकरी संघटना त्यांच्या गोदामात जाऊन झाडाझडती घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडेल असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे जिलाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला.
आज दिनांक 21 जुले रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात धडक दिली.
कृषी सेवा केंद्र चालक संघटनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत असल्याच्या अनुषगाने शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज अचानक जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात धडक दिली. शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने उभ्या राहनाऱ्या कर्तव्यदक्ष डॉ.खोत यांच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शेतकरी संघटना नेहमीच उभी असून चुकीचे काम करणाऱ्या आणि लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्र विरोधात कारवाई करणाऱ्या डॉ खोत यांचा यावेळी संघटनेच्या वतीने सत्कार करन्यात आला. कृषी सेवा केंद्र चालकांनी अगोदर शेतकऱ्यांना चांगली सेवा द्यावी,स्वतः त्रुट्या दूर कराव्यात आणि ज्यांच्या भरवशावर व्यवसाय आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे मत कौठकर यांनी व्यक्त केले. आणि कृषी सेवा केंद्राच्या दबाव तंत्राला बळी पडून कोणीही कारवाई करन्यास टाळाटाळ करत असेल तर त्याविरोधात सुद्धा शेतकरी संघटना बंड करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कौठकर यांच्या सोबत यावेळी या प्रसंगी महिला आघाडी प्रमुख प्रमिलाताई भारसाकळे, अडगाव शाखा प्रमुख मोहन खिरोडकर, सोपान इंगळे, गोपाळ निमकर्डे, दिनेश गिर्हे, शेख इम्रान, संजू ढोकने, रामकृष्ण थोटे, नदिमोद्दीन, शेख इस्माईल, आदित्य माळगे, अशोक बागडे, अमीर अली, अलियाबाद येथील श्रीकृष्ण पागृत यासह 8 वर्षीय चिमुकली कु.विरा कौठकर यासह अनेक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शेतकरी उपस्थित होते.