३ वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर फांदी पडल्याने मृत्यू

0
274

संग्रामपूर: तालुक्यातील चांगेफळ येथे ३ वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर चिंचेच्या झाडाची फांदी पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. गावाशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ काही मुले खेळत होती. दरम्यान फांदी अंगावर पडल्याने त्याठिकाणी खेळत असलेल्या भावेश सुभाष साबे वय ३ वर्ष याचा जागेवरच मृत्यू झाला. तर आणखी एक मुलगा जखमी झाला आहे. तर दोन दिवसापूर्वी लोणार तालुक्यातील रायगावजवळ दुचाकी अपघातात मालवाहूने धडक दिल्याने कार्तीक धोत्रे  वय ३ वर्ष रा. गोत्रा ता. लोणार हा ठार झाल्याची घटना घडली होती. जिल्ह्यात तीन दिवसात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

Previous articleविद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
Next articleखुल्या मिठाई विक्रीवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख अनिवार्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here