दिर्घ काळानंतर अकोल्यात ‘दोन’ पॉझिटीव्ह, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

0
158

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क

अकोला :अकोला शहरात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 139 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते रेल ता.अकोट व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65183 आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.

Previous articleराजपथने रचला इतिहास , 109 तासात 84.400 कि. मी. बिटूमीनस काँक्रीट पेविंग कार्याचा विश्वविक्रम
Next articleअग्नीविर योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here