डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन

0
92

नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर: राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्‍जवे या रूग्‍णालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अकोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या निधनाने संघ परिवार ची फार मोठी हानी झाली. राष्ट्रभक्त विचारांची एक रूप, अनेक संकट सहन करून भारताला वैभवशाली करण्यासाठी तत्पर राहणारे व्यक्तिमत्व व सर्वांचे मार्गदर्शक निघून गेल्याने न भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल अर्चनाताई मसने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्‍युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदा-या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे. त्‍यांचे पार्थीव शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं. ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

Previous articleविकासाची दूरदृष्टी असलेले लोकनेते नितीनजी गडकरी आणि संजयभाऊ धोत्रे
Next articleराजपथने रचला इतिहास , 109 तासात 84.400 कि. मी. बिटूमीनस काँक्रीट पेविंग कार्याचा विश्वविक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here