नांदुरा: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी विविध भागातील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वार्ड 1 मधील 52 वर्षीय पुरुष, नांदुरा खुर्द येथील 59 वर्षीय पुरुष, वार्ड क्रमांक 3 मधील आठ वर्षाची मुलगी, पंचवटी समोरील 54 वर्षाचा पुरुष व 45 वर्षीय, मारुती चौक लहान्या गावतील 70 वर्षे महिला, 71 वर्षीय वृद्ध, लहान्या गावातील 45 वर्ष महिला, पोलिस वसाहतीमधील 40 वर्षीय पोलीस, बुलडाणा रोड वरील 48 वर्ष महिला, अकरा वर्षाची मुलगी, शारदा नगरमधील 58 वर्षीय पुरुष, पन्नास वर्षे महिला, 23 वर्षीय युवक, 31 वर्षीय महिला, वार्ड क्रमांक 1 मधील 27 वर्षीय पुरुष, मातोडा येथील वृद्धाचा समावेश आहे.